Ad will apear here
Next
समग्र विश्वकोश तुमच्या हातात
मराठी विश्वकोश अॅपचे लोकार्पण करताना (डावीकडून) मराठी विश्वकोशाचे सहायक संपादक सरोजकुमार मिठारी, विश्वकोश मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार, ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर, मंडळाचे अध्यक्ष तथा प्रमुख संपादक दिलीप करंबेळकर, सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर.
वाई/पुणे : गुगलचा उदय होण्याआधी कित्येक वर्षांपासून मराठी वाचकांची ज्ञानाची भूक भागविणाऱ्या मराठी विश्वकोशाच्या वीस जाडजूड खंडांमधील माहितीचा सागर आता अवघ्या चार ‘एमबी’च्या मोबाइल अॅपमध्ये मोफत उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेले विश्वकोश बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन मोबाइल अॅपच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने विकसित केलेल्या या अॅपचे १२ जानेवारी २०१८ रोजी वाई येथे झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले. 

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विश्वकोश मंडळ आणि वाचन जागर अभियानाच्या संयुक्त विद्यमाने वाईमध्ये १२ ते १५ जानेवारी या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आणि विश्वकोश अॅपचे लोकार्पण असा कार्यक्रम १२ जानेवारी रोजी वाईतील महागणपती घाटावर झाला. त्या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर, वाई नगरपालिकेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, मराठी विश्वकोशाचे सहायक संपादक सरोजकुमार मिठारी, विश्वकोश मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार, सहायक सचिव डॉ. जगतानंद भटकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

विश्वकोश अॅपबद्दल माहिती सांगताना मंदार जोगळेकर.गेल्या वर्षी मराठी राजभाषा दिनी (२७ फेब्रुवारी २०१७) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, ग्रंथाली आणि बुकगंगा डॉट कॉम यांच्या सहकार्याने हे खंड पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे इंटरनेट नसलेल्या ठिकाणी, तसेच शाळांमध्येही त्याचा वापर करणे सहज शक्य झाले. त्यानंतर आता पुढचे पाऊल टाकून विश्वकोशाचे वीसही खंड अॅप स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत हे अॅप मोफत विकसित करून दिले आहे. त्यामुळे मराठी जनांना माहितीचा सागर आता आपल्या मोबाइलमध्ये उपलब्ध झाला आहे. 

विश्वकोशाच्या वीस खंडांतील ३१२ सूची आणि तब्बल १८ हजार १६३ लेखांचा यात समावेश आहे. ही सर्व माहिती युनिकोड स्वरूपात असल्याने आपल्याला हवा तो शब्द वापरून त्या संदर्भातील माहिती शोधणेही सहज शक्य आहे. सर्व मराठी भाषकांना आणि मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या जगभरातील सर्वांनाच हे अॅप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

मोफत अँड्रॉइड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/TxPXyK 
आयफोन आणि आयपॅड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/pXNNFp
विश्वकोश पेन ड्राइव्ह खरेदी करण्यासाठी लिंक : http://www.bookganga.com/R/7HX54

(विश्वकोश अॅपच्या लोकार्पणप्रसंगी ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर यांनी अॅपची वैशिष्ट्ये सांगितली. त्याबद्दलचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)



विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील कर्मचारी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZULBK
Similar Posts
मराठी भाषेतील ज्ञानसागर असलेले विश्वकोश पेन ड्राइव्हमध्ये पुणे : मराठी भाषेतला ज्ञानाचा सागर असलेले विश्वकोशाचे वीस खंड आता युनिकोड स्वरूपात अवघ्या एका पेन ड्राइव्हमध्ये सामावले आहेत. आजच्या (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिनी मराठी जनांना मिळालेली ही सर्वोत्तम भेट समजता येईल. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, ग्रंथाली आणि बुकगंगा डॉट कॉम यांच्या
‘यक्षप्रश्न’मध्ये सुलोचना नातू प्रशालेची बाजी ‘भाषा फाउंडेशन’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘यक्षप्रश्न’ ही राज्यस्तरीय आंतरशालेय प्रश्नमंजूषा स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पुण्यातील भारतीय विद्या भवन संस्थेच्या सुलोचना नातू प्रशालेने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना ‘बुकगंगा’तर्फे बक्षीस स्वरूपात पुस्तके देण्यात आली.
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language